बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खानची लवकरच होणार बाॅलिवूडमध्ये एन्ट्री; अॅक्टींग नाही तर ‘हे’ काम करणार

मुंबई | गेल्या काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत होता. त्यातच आता आर्यन खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, आर्यन खान अॅक्टिंग करणार नाही तर चित्रपट निर्मितीचं काम करणार आहे. आर्यन खान ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा फिल्मसाठी स्क्रिप्ट रायटिंग करणार आहे.

आर्यन खान एका फिचर फिल्मवर काम करत आहे. आर्यन खानची ही फिल्म शाहरूख खानची रेड चिलिज एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसद्वारे तयार करण्यात येणार आहे. आर्यन खान बिलाल सिद्दीकीसोबत सहलेखक म्हणून काम करणार आहे. त्यातच शाहरूख खानची मुलगी सुहानाही अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

सुहाना नेटफ्लिक्सवर वेब सिरीजद्वारे डेब्यू करणार आहे. या सीरिजच दिग्दर्शन जोया अख्तर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहरूख खानही लिखानात रस दाखवत आहे. त्यातच शाहरूख खान आता मुंबई येथे पुढील चित्रपटाचं शुटींग करत आहे. त्यानंतर शाहरूख खान दीपिका पदुकोणसोबत स्पेनला जाणार आहे.

दरम्यान, आर्यन खान शाहरूखप्रमाणे अभिनय करणार नाही. तो आता स्क्रिप्ट रायटिंगचं काम करणार आहे. याशिवाय शाहरूख खानच्या काही चित्रपटांसंदर्भात कोणत्या चित्रपटांचे रिमेक आणि राईट्स खरेदी करणार आहे. एका रिपोर्टनुसार, आर्यनकडून फिडबॅक मिळवण्यासाठी पठाण चित्रपटातील लूक आणि अॅक्शन सीनही शाहरूख खानने दाखवले आहेत.

थोडक्यात बातम्या-  

“शिवसेना-भाजपच्या मैत्रीसाठी संजय राऊतांना भेटणार, महाराष्ट्राच्या भल्यासाठी…”

दिशाच्या आई-वडिलांनी मौन सोडलं, दिशाच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर

महाराष्ट्र मास्कफ्री होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

“दिशा सालियन प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार, सर्व पुरावे तयार”

दारू पिण्याचं वय केलं कमी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More