बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आर्यन खानला गांजा दिला होता, पण….’, अनन्या पांडेचा मोठा खुलासा

मुंबई | मुंबई क्रुझ प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चाललेलं पाहायला मिळत आहे. अशातच आता ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेचंही नाव समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एनसीबीनं अनन्या पांडेला समन्स बजावलं होतं. त्यामुळे सध्या तिची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान अनन्यानं आता मोठा खुलासा केला आहे.

ड्रग्ज केसमध्ये चौकशीसाठी आज सलग दुसर्‍या दिवशी अनन्या मुंबईत एनसीबी ऑफिसमध्ये दाखल झाली आहे. काल एनसीबी टीम अनन्या पांडेच्या घरी दाखल झाली होती. त्यानंतर तिला समन्स पाठवून चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं होतं. या चौकशीमध्ये अनन्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला.

चौकशीमध्ये अनन्यानं सांगितलं की, तिनं आर्यन खानला गांजा दिला होता, पण ती कुठल्याही ड्रग्ज पेडलरशी संपर्कात नाही. आर्यनच्या सांगण्यावरून एका मित्राकडून तिनं एक-दोन वेळा मागवलं असल्याचंही तिनं सांगितलं.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडे हिच्यासह आर्यन खान आणि त्याची बहीण सुहाना हिचंही नाव पुढे आलं आहे. आता या प्रकरणात आणखी कोणा-कोणाची नाव समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

एसटी प्रवास महागणार, इंधन दरवाढीचा आता प्रवाशांनाही बसणार मोठा फटका

शेतकऱ्यांची धाकधुक पुन्हा वाढणार?; हवामान विभागाचा ‘या’ भागात पावसाचा अंदाज

“देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं”

‘मी हे खपवून घेणार नाही’; क्रांती रेडकर कडाडली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More