बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एक बाप म्हणून मी खूप…’; आर्यन खानच्या जामिनानंतर आर. माधवनचं ट्विट

मुंबई | देशभरात गाजत असलेला मुंबईतील कथित क्रूझ ड्रग्स प्रकरण राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान मागील 2 ऑक्टोबरपासून तुरूंगात होता. त्याला आज मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता आर. माधवनने आर्यन खानच्या जामिनानंतर ट्विट केलं आहे.

देवाचे आभार मी एक बाप म्हणून खूप समाधानी आहे. सर्व चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडू दे, अशा आशयाचं ट्विट आर. माधवनने केलं आहे. आर्यन खानला आज मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 24 दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे. सर्व बॉलिवूडमधून आर्यन खानच्या समर्थनार्थ शाहरूख खानला पाठिंबा मिळत आहे.

वेदांतने गालुरू येथे झालेल्या 47व्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये 7 पदके जिंकली आहेत. त्यानंतर माधवनने याला संस्कार म्हणतात, असं ट्विट करत शाहरूखला खोचक टोला लगावला होता. आर्यन खान आणि त्याचे मित्र मुनमुन धामेचा, आरबाज मर्चंट यांना देखील आज जामीन मिळाला आहे.

दरम्यान, आर्यन खानची न्यायालयामध्ये बाजू मांडण्यासाठी देशाचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली आहे. त्यांच्यासह सतीश मानशिंदे देखील उपस्थित होते. आर्यन खानची दिवाळी तुरूंगात न जाता आपल्या मन्नत या घरी होणार आहे. आर्यन खानच्या सुटकेमुळे अनेक बॉलिवूडमधील शाहरूख खानच्या सहकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पाहा ट्विट – 

थोडक्यात बातम्या –

“मला आता ‘बाबूराव गणपतराव आपटे’ पात्रातून सुटका हवी आहे”

“सुजय विखे पाटलांनी चांगलं काम केलंय, त्यांना चांगला जावई मिळेल”

“राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न केलं तर त्यांचं मन शांत होईल”

संगीत क्षेत्रातही नरेंद्र मोदी नावाचा डंका! आता ‘नरेंद्र’ नावाच्या रागाची निर्मिती

दिवाळीआधी सोनं पुन्हा महागलं! वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More