अमरावती | शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत भाजपकडून नेते नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची बहिण संगिता शिंदे यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल करुन राजकारणात प्रवेश केला आहे.
एकीकडे बोंडेंसाठी त्यांचा भाजप पक्ष आहे तर दुसरीकडे त्यांची बहिण असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला असल्यामुळे अनिल बोंडे गहिवरुन गेले.
संगिता शिंदे यांनी आपला भाऊ आणि वडिल यांचा अशिर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली. मी पक्षासाठी काम करेन मी तिला भाऊ म्हणून अर्शिवाद दिला असल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले आहे.
माझे भाऊ भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते त्यांच्या पक्षाशी प्रामाणिक राहतील. अनिल बोंडे यांनी मला लहान बहिण म्हणून अर्शिर्वाद दिला आहे, असं मत संगिता यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर धोनी वळला ‘या’ व्यवसायाकडे!
‘या’मुळे औरंगाबाद आणि नागपूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त; ट्विटरवरून स्वतः दिली माहिती