“जोपर्यंत भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतूक करणार नाहीत”
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही सभांमध्ये राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) जोरदार टीका केली होती. त्यातच आता राष्ट्रवादीचे(NCP) प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे तोवर महाराष्ट्राचे कौतूक करायचे नाही, असं त्यांनी ठरवलं असेल. त्यामुळे ते दुसऱ्या राज्याचे कौतूक ते करणारचं, असा जोरदार टोला जयंत पाटलांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरविल्यानंतर राज ठाकरे यांनी कौतूक केलं होतं. त्यावरून जयंत पाटलांनी शाब्दिक टोलेबाजी केली आहे.
एकदा गुजरातचं कौतूक करून झालं. आता युपीचं कौतूक करतील. महाराष्ट्र सोडून सर्व राज्यांचे कौतूक करतील आणि महाराष्ट्र सोडून सर्व राज्यांचे कौतूक करायला दौरेे काढतील. दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन त्या राज्यांचे कौतूक राज ठाकरे करतचं राहणार आहेत, अशी बोचरी टीका जयंत पाटलांनी केली आहे.
दरम्यान, वाढत्या महागाईवरून जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. भारतात प्रचंड महागाई वाढलेली आहे. त्याचे दुष्परिणाम श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहेत. खरे महागाईचे मुळ केंद्रात आहे हे विसरता येणार नाही. देशातील महागाईची जबाबदारी राज्याराज्यावर टाकून हात झटकण्याचा प्रयत्न होत आहे, असा घणाघात जयंत पाटलांनी केला.
थोडक्यात बातम्या-
“देवेंद्र फडणवीस येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील”
हाय गर्मी ! उन्हाचा तडाखा पाहून महिलेनं चक्क गाडीवर भाजली चपाती, पाहा व्हिडीओ
राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार?, समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती
“महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटांसाठी झगडावं लागतंय”; ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
Mumbai Local: रेल्वे प्रवाशांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!
Comments are closed.