बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हुंड्यामध्ये बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाने भर वरातीत काढले कपडे अन्…

लखनऊ |  उत्तर प्रदेशमधील हाथसरमध्ये अत्यंत लजास्पद घटना समोर आली आहे. लग्नात हुंड्यामध्ये बुलेट न दिल्यामुळे भर वरातीत तमाशा घातला. यानंतर त्याने बुलेटचाच हट्ट धरल्यामुळे मुलीच्या वडिलांना हतबल होऊन धक्कादायक पाऊल उचलाव लागलं. समाजात अनेकांनी हुंड्यामुळे सूनेचा छळ करुन तिची हत्या देखील केल्याचे अनेक गुन्हे आहेत.

उत्तरप्रदेशातील एका तरुणाच्या लग्नात सासरच्या लोकांनी त्याला बुलेटऐवजी अपाचे बाईक दिली. या गोष्टीचा खुलासा लग्नाच्या दिवशी झाला. मुलीकडचे लोक त्याला बुलेट देत आहेत, असा समज मुलाला झाला होता. त्यामुळे तो वरात घेऊन हाथरसमध्ये पोहोचला. सगळीकडे जल्लोषाचं वातावरण होतं. त्याला बुलेट नाही तर अपाचे बाइक दिली जात आहे, अशी माहिती त्याला मिळाली.

हे समजताच नवरदेव भडकला आणि घोड्यावरून खाली उतरला. एवढंच नाही तर त्याने त्यानंतर त्याचे कपडे काढले आणि अंडरगारमेंटमध्ये सर्वांसमोर उभा राहिला. असे सांगितले जात आहे की, त्याला कुणीतरी बीअर पाजली होती. त्याने जे केलं त्यावेळी तो नशेत होता

दरम्यान, जोपर्यंत त्याला बुलेट दिली जात नाही तोपर्यंत तो हा ड्रामा सुरूच ठेवणार आणि लग्न करणार नाही, असं नवरदेवानी यादरम्यान म्हटलं आहे. मुलीकडचे लोक जर तक्रार करतील तर केस दाखल केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी तेव्हा दिली. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी हे लग्न होणार नसल्याचं जाहीर केलं.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे अजित पवारांना माहिती”

“शेतकरी, सलून दुकानदार, टॅक्सी चालक, मुंबईतील डबेवाले यांना आर्थिक पॅकेज द्या”

पाकिस्तानच्या बाबर आझमची तुफानी खेळी, 19 चेंडूत चोपल्या 84 धावा!

बाद झाल्याचा राग खुर्चीवर काढला; नियमभंग केल्यानं कोहलीवर कारवाईची टांगती तलवार

‘बेड द्या नाहीतर माझ्या वडिलांना इंजेक्शन देऊन मारुन तरी टाका’; वडिलांना तडफडताना पाहून मुलगा संतापला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More