बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मामाच्या साखर कारखान्यावर ईडीची कारवाई होताच अजित पवार म्हणाले…

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाटगे यांच्या जरंडेश्ववर साखर कारखान्यावर ईडीने काल कारवाई केली आहे. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे. जरंडेश्ववर साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. ईडीच्या या कारवाईवर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखाना माझ्या नातेवाईकांचा असला तरी ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सीआयडीने देखील यापुर्वी चौकशी केली होती, मात्र त्यातून काही निष्पन्न झालं नाही. आता वकिलांचा सल्ला घेऊन जरंडेश्वर कारखान्याद्वारे न्यायालयामध्ये अपील केली जाईल.

तसेच सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात 14 कारखान्यांचा समावेश होता. यामध्ये माझ्या नातेवाईकांचा जरंडेश्वर कारखाना देखील होता. मात्र, 2016 आणि 2017 मध्ये सर्व रितसर परवानग्या घेण्यात आल्या होत्या, अशी देखील माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, साखर कारखान्यांच्या अनेक मालकांनी बँकेतून कर्ज घेऊन बुडवलं आहे. त्यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली असल्याची माहिती समजत आहे. यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्याप्रमाणे मुंबई शाखेच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करत त्यानुसार ही कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘अजितदादा आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी…’; नवाब मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप

तुमचं सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर…- जयंत पाटील

ठाकरे सरकार पाडण्याचा नाही तर आम्ही दुसराच प्लॅन आखतोय, दानवेंनी भाजपचं सिक्रेट फोडलं!

‘मी आपणासही विनंती करु इच्छितो की…’; उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना रोखठोक उत्तर

फिल्मी स्टाईलने पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या; आरोपीला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More