बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माही रिटन्स! मैदानावर येताच धोनीनं टोलवला 114 मीटरचा सिक्स; पाहा व्हिडीओ

चेन्नई | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मागील आयपीएल सुरू होण्याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर धोनीच्या फॅन्समध्ये नाराजीच वातावरण होतं. धोनी आयपीएलला खेळणार असल्याचं कळताच फॅन्स खूश झाले होते. आता 9 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आयपीएल सत्रासाठी धोनी मैदानात उतरला आहे. तब्बल 5 महिन्यांनंतर धोनीच्या चाहत्यांना धोनी मैदानात खेळताना पाहता येणार आहे.

आयपीएल मध्ये चांगल्या कामगिरीसाठी चेन्नईचा संघ मैदानात सराव करताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंगचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील सरावासाठी मैदानात उतरला आहे. त्याचा सराव करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यात धोनीने 114 मीटरचा षटकार मारला. तर त्याआधी त्याने 109 मीटरचा षटकार मारला आहे. याचा व्हिडीओ चेन्नईच्या संघाने त्यांच्या इंस्ट्राग्रामवर शेअर केला आहे.

धोनी पुन्हा त्याच्या फाॅममध्ये आला असल्याने त्याचे चाहते सुखावले आहेत. तर सोशल मीडियावर #DhoniReturns असा हॅशटाॅग चालू आहे. आगामी सत्र हे चेन्नईसाठी 14 वे सत्र असणार आहे. तर या वर्षी आयपीएल भारतात होणार आहे. परंतू कोरोनामुळे यंदा आयपीएल सामने प्रेक्षकांशिवाय होणार आहे. तर अंतिम सामन्यांसाठी 50% प्रेक्षकांच्या उपस्थितीला मान्यता दिली जाऊ शकते.

दरम्यान, चेन्नईसाठी मागील आयपीएलचं सत्र चांगलं राहिलं नाही. चेन्नईचा संघ प्लेऑफ च्या आधीच बाहेर पडला होता. तर चेन्नईमध्ये मागील वर्षी तरूण खेळाडूंची कमतरता भासत होती.

पाहा व्हिडीओ-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

थोडक्यात बातम्या- 

महिलेचा मोदींसोबत फोटो छापून आला, वास्तव समोर आल्यावर उडाली खळबळ

मोठी बातमी : 100 कोटी प्रकरणात आता ‘ईडी’ची एन्ट्री?

…म्हणून या जोडप्यानं नव्या शेजाऱ्यांना वाटली चक्क मोफत बीअर!

“कारवाई न करण्यासाठी 50 लाख तर नोकरीत परत घेण्यासाठी 2 कोटी”; परमबीर सिंग अडचणीत

शरद पवारांनी नाव घेतलेले ज्युलिओ रिबेरो म्हणतात, “हे काम मी करणार नाही!”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More