बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घराचे फोटो व्हायरल होताच ऊर्जामंत्री म्हणतात, “माणसाने लॅविश राहू नये का?”

मुंबई | महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालय आणि घराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर नितीन राऊत यांनी स्वतः पुढे येत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून काल ऊर्जा मंत्री यांच्या घर आणि कार्यालयाचे फोटो पोस्ट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

नितीन राऊत यांनी या सर्व प्रकरणावर बोलताना माणसाने लॅविश राहू नये का? असा प्रश्न विरोधकांना विचारला आहे. तसेच आपण कोणतेही बेकायदेशीर तसेच नियमबाह्य काम केलेले नाही आणि मला चांगले राहायला आवडते यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. गेले एक वर्ष झाले शासकीय निवासस्थान राहायला मिळालं नसल्याने मी भाड्याच्या घरात राहिलो असंही त्यांनी सांगितलं.

मी जरी गरीब कुटुंबातून वर आलो असेल तरी मी पायलट होतो आणि त्यावेळीही मी असाच राहायचो. सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधीन राहून काम करत आहे. त्यामुळे लोकांना जे समजायचे त्यांनी ते समजावं. मी ऊर्जा खात्याचा मंत्री असल्याने काही लोकांना ते सहन होत नाही. त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत असंही त्यांनी बोलून दाखवलं.

मी काही वेगळं केलं नाही. असं म्हणत इतर मंत्र्यांचे बंगलेही अशाच प्रकारचे आहेत आणि फोटोत असलेला टीव्ही माझ्या स्वतःच्या खर्चाने मी आणला असून या आधीच्या घरीही मोठा टीव्ही असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नितीन राऊत यांनी “मी दलित समाजाचा व्यक्ती असल्याने आम्ही टीका करण्यासाठी सॉफ्ट वेपन असतो आणि सगळे आमच्यावर टीका करतात आणि आम्ही काम करू शकत नाही असा आरोप करतात.” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच विरोधकांच्या या प्रयत्नाने पक्षश्रेष्ठी काय माझं मंत्रिपद काढून घेणार नाहीत असंही यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या –

महिलासंदर्भात वागताना, बोलताना… सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश-वकिलांना महत्त्वाचा सल्ला

‘काहीजण वडिलोपार्जित संपत्ती विकून घरखर्च भागत असेल तर हे…’; रोहित पवारांची मोदींवर टीका

‘या’ कारणामुळे बांगलादेशच्या कर्णधाराने आगामी टी ट्वेन्टी सिरीज न खेळण्याचा घेतला निर्णय!

मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला, म्हणाल्या…

महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More