बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

असदुद्दीन ओवैसींचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, म्हणाले…

नवी दिल्ली | एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) गंभीर आरोप केला आहे. संसदेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते संसदेबाहेर पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वि. दा. सावरकर (V. D. Savarkar) आणि के. बी. हेडगेवार (K. B. Hedgewar) यांच्या धोरणांवर काम करतात. त्यांच्या धोरणावर काम करत त्यांनी देशातील मुस्लिम नागरिकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविले आहे, असे ओवैसी म्हणाले.

केंद्र सरकारच्या स्वानिधी योजनेंतर्गत (Svanidhi Yojna) देशात रस्त्यातील फेरीवाले आणि रस्त्यांवर ठेला लावून बसणाऱ्यांना कर्ज दिले जाते. त्यामुळे आम्हाला आरटीआयच्या (RTI) एका उत्तरात माहिती मिळाली आहे की, देशातील 32 लाख लोकांपैकी केवळ 331 अल्पसंख्याकांनाच कर्ज दिले गेले आहे, असे ओवैसी म्हणाले. त्यामुळे ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तसेच एनएसओच्या (NSO) आकडेवारीनुसार, शहरी भागांत मुस्लिम समाजाचे लोक 50% स्वयंरोजगार क्षेत्रात आहेत. आणि हिंदू समाजातील लोक फक्त 33% स्वयंरोजगार क्षेत्रात आहेत. भारतातील स्वयंरोजगार क्षेत्रात मुस्लिम समाजाचा वाटा सर्वाधिक आहे तर मग फक्त 331 लोकांनाच या योजनेचा लाभ का मिळाला? बाकी लोक या योजनेतून वंचित का ठेवले गेले? असे प्रश्न यावेळी ओवैसींनी विचारले.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) राजकारणात अशोक राजभर (Ashok Rajbhar) आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) हे दोघे मिळून मला शिवीगाळ करायचे आता ते आपआपसात भांडत आहेत. हे फसवे आणि खोटे लोक आहेत. त्यांनी मिळून राज्यातील मुस्लिमांचा विश्वासघात केला आहे. ह्या लोकांमध्ये भाजपला हरविण्याची ताकद नाही. केवळ त्यांनी मुस्लिमांची मते घेण्याचे राजकारण केले, असंही ओवैसी म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

‘यापूर्वी आला नव्हतात पण आता याच’, बंडखोर आमदाराचं आदित्य ठाकरेंना आव्हान

‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजीरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये’, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही ‘या’ गोष्टींची सवय असेल तर सावधान! आरोग्यावर होतील विपरित परिणाम

‘घर नसल्यामुळे पार्कमध्ये झोपायचे’, उर्फीने सांगितली तिच्या संघर्षाची कथा

रणवीरचा ट्रेंड साऊथमध्येही, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानेही केलं न्यूड फोटोशूट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More