बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लग्न झालं, अजित पवार 48 तासांसाठी नवरदेव झाले अन् नवरी…”

सोलापूर | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. सर्वच पक्ष आपलं राजकीय समीकरण जुळवताना दिसत आहेत. अशातच आता आरोप प्रत्यारोपाचा सामना देखील दिसून येतोय. त्यातच आता एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असद्दुदीन ओवैसी (AIMIM president Asaduddin Owaisi) यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका (Asaduddin Owaisi criticize the Mahavikas Aghadi government) केली आहे.

असद्दुदीन ओवैसी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली आहे. केवळ तुमचा परिवार आणि कुटुंब वाचवण्यासाठी तुम्ही शिवसेनेबरोबर आहात, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) 48 तासांसाठी नवरदेव झाले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांनी लग्न केलं होतं. यात आता नवरी कोण याची माहिती शरद पवार देतील, अशी खोचक टीका देखील असद्दुदीन ओवैसी यांनी केली आहे.

शिवसेना देखील भाजप सारखी जातीयवादी झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रवादीने शिवसेनेवर देखील टीका केली होती. आता शिवसेनेसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली आहे, असंही ओवैसी म्हणाले आहेत.

दरम्यान, मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण हवं आहे मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ते दिलं नाही. ज्यांना जमीन आहे त्यांना आरक्षण दिलं जातंय. मात्र, ज्यांच्याकडे जाळण्यासाठी तेल नाही, त्यांना आरक्षण दिलं जात नाही, असंही असद्दुदीन ओवैसी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

लहान मुलांसोबतचा ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवाब मलिकांनी शेअर केलेल्या ‘त्या’ स्क्रिनशॉटनंतर क्रांती रेडकर नि:शब्द

“भाजपने अन्नदात्याचा केलेला अपमानाला देश विसरणार नाही”

‘त्या’ बहूचर्चित पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पुर्ण

कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा?, केंद्रीय कृषीमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More