बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आसाराम बापू आयसीयूमध्ये दाखल; काही दिवसांपुर्वी झाला होता कोरोना

जयपूर | जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गेल्या महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला होता. या ठिकाणी जवळपास 12 कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांना तुरुंगातील दवाखान्यात विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. यातच जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या आसाराम बापूंना देखील कोरोना लागण झाली होती.

फसवणूक, खंडणी, बलात्कार अशा विविध आरोपांखाली सध्या तुरूंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूंना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना महात्मा गांधी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतू, त्यानंतर त्यांची तब्येत आणखीनच बिघडल्यानं त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून आसाराम बापूंना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत होती. सोमवारी 3 मे रोजी त्यांंची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी 5 मे रोजी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याची प्रकृती आणखीनच बिघडली. त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना आयसीयूमध्ये दाखल केलं आहे.

दरम्यान, 18 फेब्रुवारीला छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तपासणी केल्यानंतर काहीही गंभीर आढळले नाही. त्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ 7 शहरात’ महिंद्रांनी सुरू केली ‘ऑक्सिजन ऑन व्हिल’ सेवा

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ; निवडणूक संपताच दरवाढीला सुरुवात

मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं सरकारनं बंद करावं – चंद्रकांत पाटील

चिंता वाढली! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ

आमदार असावा तर असा; अन्… ‘या’ आमदाराचा चक्क कोविड सेंटरमध्येच मुक्काम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More