बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

श्री श्री गोडसे यांना लवकरच ‘भारतरत्न’ देण्याची मागणी होईल- असदुद्दीन ओवैसी

हैद्राबाद | भाजपच्या उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी नथुराम गोडसेला दहशतवादी म्हणल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या या वक्तावर टीका केली आहे.

पुढील काही वर्षात श्री श्री गोडसे यांना भारतरत्न देण्याची शिफारस केली जाईल, असं म्हणत ओवैसी यांनी भाजप आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदींनी प्रज्ञा ठाकूरच्या उमेदवारीचे समर्थन केलं आहे. ठाकूर यांचं ते वैयक्तीक मत नाही, असं म्हणत त्यांनी भाजप स्वतंत्र भारतातल्या पहिल्या दहशतवाद्यासोबत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, साध्वीने गांधी आणि नथूराम गोडसेंबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय आहे. गांधींजींबद्दल वक्तव्य करणाऱ्यांना मी कधी माफ करू शकणार नाही, असं मोदी म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

-“अशा देशभक्तांपेक्षा देशद्रोही म्हणून घेणं अधिक अभिमानाचं”

-नथूराम गोडसे दहशतवादीच होता- प्रकाश आंबेडकर

-भाजपचे 80 कार्यकर्ते मारले गेले, बंगालमधील हिंसेला ममता जबाबदार- अमित शहा

-मोदीं देशाला पुढे घेऊन जातायेत हे दृष्य पाहायला आवडलं असतं- राहुल गांधी

-नरेंद्र मोदींच्या पहिल्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More