Loading...

भारत कधीच हिंदूराष्ट्र नव्हता आणि होणारही नाही- असदुद्दीन ओवैसी

मुंबई |  भारत कधीच हिंदूराष्ट्र नव्हता, सध्याही नाहीये आणि इथून पुढेही होणार नाही, असं ट्वीट करत एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना टोला लगावला आहे.

मोहन भागवतांचा डाव आम्ही कधाही यशस्वी होऊ देणार नाही. भारत देशाची हिंदूराष्ट्र अशी ओळख करून आम्ही आमच्या देशाचा इतिहास मिटवू शकत नाही, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

Loading...

आपली संस्कृती, श्रद्दा आणि वैयक्तिक ओळखही हिंदू धर्माशी जोडलेली आहे, असा आग्रह ते आम्हाला करू शकत नाहीत. त्यामुळे भागवतांचं ते स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असा इरादा औवैसींनी बोलून दाखवला आहे.

दरम्यान, भारत हा हिंदूंचा आहे आणि आपलं राष्ट्र हे हिंदू आहे, असं मोहन भागवत एका सभेत म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर ओवैसी यांनी तोफ डागली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...