बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्याचे प्रश्न कोमात अन् स्वबळाची छमछम जोरात”

मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळाची भाषा केली होती. त्यावर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं दिसत होतं. त्यामुळे महाविकास आघाडीत फुट पडली का? असे प्रश्न उपस्थित होत होते. त्यानंतर भाजपने संधी साधत महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली होती. आता पुन्हा भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

स्वबळावर लढणार, आम्ही स्वबळावर लढणार. एक म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, अशी तिन्ही सरकारमध्ये रोज सकाळ संध्याकाळ एकच चर्चा असते. दुसरा म्हणतो त्यावर अग्रलेख लिहिणार, तर तिसरा म्हणतो दुसऱ्याला भेटायला जाणार, मग सगळे एकत्र भेटतात, अशी सगळी स्वबळाची छमछम राज्यात सुरू आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. राज्यात बाकी काही ऐकू येत नाही. फक्त लेडिज बारची छमछम ऐकू येते, असंही शेलार म्हणाले.

मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, पाऊस, पूर, कोरोना, लॉकडाऊन,शेतकरी, बियाणे, खते, पिक वीमा, वीज, अडचणी आलेले अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी असे राज्यासमोर अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र, सगळे प्रश्न कोमात आणि सरकारमधील तीन पक्षांमध्ये स्वबळाची छमछम जोमात असं चित्र राज्यात आहे, अशी टीका देखील आशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान, सरकार 5 वर्ष टिकेल असा जप सरकारचे मंत्री आणि नेते दररोज 108 वेळा करतात. मग स्वबळ असं चित्र दुर्देवी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राज्यासमोर अनेक गंभीर विषय असताना देखील सरकार त्यावर चर्चा करायला तयार नाही, असा आरोप देखील शेलारांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

CET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठीची वेबसाईट बंद; अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार मुदतवाढ

‘वाद विकोपाला गेला तर आम्हाला दंगल काही नवीन नाही’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही- राजेश टोपे

‘रात्री अपरात्री लोकांचे फोन यायचे…’; खासदार मनोज झा यांचं मन सुन्न करणारं भाषण

कोरोना व्हायरसचा होऊ शकतो मेंदूवर परिणाम; धक्कादायक माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More