Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

…म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं- आशिष शेलार

Photo Credit- Facebook/ Ashish Shelar, Uddhav Thackarey

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि योग्य ती कारवाई करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

संचारबंदी आणि नियम कडक करायचे की नाही? हे सर्वस्वी जनता ठरवणार आहे. लोकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेण्याची जबाबदारी पोलीस आणि जिल्हा प्रशासनावर आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास शिथिलता न दाखवता कडक कारवाई करावी, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. मात्र महाराष्ट्रातील कोरोनो रुग्णात वाढ होण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला. कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात सरकार अपयशी ठरलं, महाराष्ट्रात रडव्यांचं रडगाणं सुरुच राहिलं आणि पुन्हा कोरोनानं डोकेवर काढलं, असं ट्विट करत आशिष शेलारांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या भागात लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

गजानन मारणेनंतर आता ‘या’ कुख्यात गुंडावर गुन्हा दाखल

टूल-किट प्रकरणातील संशयितांची न्यायालयात धाव; न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय!

वाहतूक नियमांचं पालन कसं करावं?; शाळकरी मुलांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल

महिला वर्षभर ‘लिव्ह इन’मध्ये राहून नंतर सांगतात माझ्यावर बलात्कार झाला- अबू आझमी

पुढील दोन दिवसांत ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या