बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपाल हे घटनात्मक पद, दबाव कशाला आणता? शेलारांचा राऊतांना अप्रत्यक्ष सवाल

मुंबई | राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार ते निर्णय घेतील. दबाव कशाला आणता?, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील…दबाव कशाला आणताय? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना,मग आता लोकशाहीने वागा…पत्रपंडितांनी अकलेचे तुणतुणं वाजवण्याची काय गरज? राजभवनाच्या नावाने बोंबा मारायला शिमगा आहे का?. असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

राजभवनाकडे तोंड करुन काल पत्रपंडित काहीतरी बोलले म्हणे…काय होतं ते ? आम्ही अगोदर नाव दिले नाही. यवतमाळच्या पोटनिवडणुकीत विसरलो…हे सांगायचे आहे की, राज्यपालांवर आता दबाव आणायचाय? इथे पत्रपंडित बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते..समजनेवाले को इशारा काफी.., असंही राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे.  समझने वालों को इशारा काफी है!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सदस्यत्वाचा निर्णय अद्यापही होत नसल्याने संजय राऊतांनी हे ट्विट केलं होत.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘उद्धव ठाकरे सरकार कुठे झोपलंय, त्यांना लाज वाटत नाही का’; बबिता फोगटची जहरी टीका

‘झुंडशाहीचं राज्य नष्ट झालं पाहिजे’; पालघर घटनेवर फरहान अख्तर संतापला

महत्वाच्या बातम्या-

आपण काय करतो याचं भान भाजप नेत्यांनी सोडू नये; गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

‘संतांची, वीरांची भूमी नाही तर …’; पालघर प्रकरणावर सुमित राघवन संतापला

पालघरमध्ये नेमकं काय घडलं?; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More