महाराष्ट्र मुंबई

“मंत्री पब-पार्टीत गुंग, कार्यकर्ते ‘गोली मार भेजे में’ स्टाईलमध्ये”

मुंबई | शिवसेनेचा लोगो असलेल्या वाहनातून प्रवास करत असलेले दोन जण बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला आहे. यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

ज्या पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो बघितल्यावर स्पष्ट होतं की, यावेळी राज्याच्या सत्तेत बसलेले युवा मंत्री पब-पार्टी आणि फिल्मी दुनिया याच्यातच वावरत आहे. कार्यकर्ते ‘गोली मार भेजे मे’ अशापद्धतीने फिल्मी स्टाईलमध्ये रस्त्यावर नाचत आहेत, असं आशिष शेलार म्हणालेत.

दुर्दैवाने हे सर्व महाराष्ट्र पाहतो आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सरकारने महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभिप्रेत असलेलं वर्तन करावं. स्वतःच्या कार्यकर्त्यांना आवरावं. फिल्मी दुनिया पाणी, पार्टी ही काही महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन नाही, असं आशिष शेलार म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

‘मी राहुल गांधींशी लग्न करायला चाललेय’; सामान घेऊन विमानतळावर पोहचली महिला

गाडीवर लोगो शिवसेनेचा; काम गुंडगिरीचं… बंदुक दाखवून केलं ओव्हरटेक

वडील रागावल्याने दहावीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

“राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल”

“अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?, हे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या