बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्य सरकारची झुंडशाही पाहून अफगाणिस्तानमध्ये तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. याप्रकरणी राणेंना अटक करण्यात आली आहे. यानंतर आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकावर जोरदार निशाणा साधला.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांस देशाच्या स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव आहे का अमृत महोत्सव आहे, हे समजत नाही. विरोधी देशास आनंद वाटावा, असे वक्तव्य करणे हे देश विरोधात कृत्य आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील, अशी झुंडशाही या सरकारची आहे. त्यामुळे आम्ही आता स्वस्थ बसणार नाही, असं म्हणत शेलारांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

राज्य सरकारची झुंडशाही व महाराष्ट्र पोलिसांचा गैरकारभार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर काठ्या मारल्या पाहिजेत, हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जोड्याने मारले पाहिजे, हे वक्तव्य आम्ही सहन केलं. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांबाबतवक्तव्य करताना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. त्यावर पडदा पडल्यानंतर झालेली कारवाई चुकीची आहे, असा दावाही शेलार यांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

नारायण राणेंना धक्क्यावर धक्के, पुन्हा अटक होणार?

शांत असलेले राऊत अखेर बोलले; “या भाडोत्रींनी भाजपलाच नागडं…”

आंदोलन राणेंविरुद्ध… गाढव, मांजर, कोंबड्यांचे मात्र प्रचंड हाल!

भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, संजय राऊत राणेंना अग्रलेखात काय काय म्हणाले?

कोर्टात घडली महत्त्वाची घटना, फक्त ‘या’ एका कारणामुळे राणेंना जामीन मिळाला?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More