बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय?”

मुंबई | चीनसारख्या देशातून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय?, असा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

कोरोनामुळे जगातील औद्योगिक परिस्थिती विलक्षण बदलली असून संभाव्य मोठे बदल होणार हे लक्षात घेऊन गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक या सारख्या राज्यांनी तातडीने उद्योगांना रेड कार्पेट घालायला सुरुवात केली. कारण लॉकडाऊन आणि कोरोना याचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून प्रत्येक राज्यात त्यामुळे मोठी स्पर्धाच सुरु झाली आहे, असं शेलार यांनी सांगितलं आहे.

केंद्र सरकारने बदलत्या परिस्थितीनुसार तातडीने बदल आणि नवी धोरणे आखायला सुरुवात करताच उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांनी जुने कायदे बदलण्यात आघाडी घेतली. सध्याचे उद्योग टिकतील व नवे उद्योग आकर्षित होतील असे नवे धोरण तयार करण्यास सुरुवात केली, असंही शेलारांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र हे औद्योगिक दुष्ट्या प्रगत राज्य म्हणून ओळखलं जातं, अशावेळी महाराष्ट्र सर्वात आधी पुढाकार घेतं. पण यावेळी महाराष्ट्राने याबाबत उशीर केला आहे, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

‘बाप बाप होता है’ वगैरे घडलंच नाही, विरेंद्र सेहवाग खोटारडा आहे- शोएब अख्तर

“कोरोनावरील लस अजून दोन वर्षे तरी अशक्य, लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं”

महत्वाच्या बातम्या-

दोन घरं, एक फार्म हाऊस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती?

रिलायन्स जिओनं ‘या’ पॉप्युलर पॅकमध्ये केला मोठा बदल; रोज मिळत होता 2 जीबी डेटा

मुंबई उच्च न्यायालयाचा कुख्यात डॉन अरुण गवळीला दिलासा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More