बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नवाब मलिकांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी ‘तो’ ठराव रद्द करावा’; भाजप नेत्याचं मलिकांना आव्हान

धुळे | मुंबई विमानतळाच्या नावावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. अशातच भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत त्यांना आव्हान दिलं आहे. धुळ्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

छत्रपती शिवरायांचं नाव कुणीही हटवू शकत नाही. ते नाव भाजपच्या काळातच दिलं गेलं आहे. त्याचा ठराव राज्य सरकारने पारीत केला आहे. अदानींचा ठराव पारीत करून राज्य सरकारने अदानींना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव झाकण्याची संधी दिली आहे का?, असा सवाल शेलारांनी केला आहे. त्यासोबतच नवाब मलिक हे उद्योगपती अदानींचे अगदी जवळचे मित्र आहेत. हिंमत असेल तर त्यांनी ठराव रद्द करावा, आव्हान शेलार यांनी मलिकांना केलं आहे.

ठाकरे सरकारने पूरग्रस्तांना जाहीर केलेल्या पॅकेजवरूनही आशिष शेलारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिलेलं पॅकेज हे वर्तमानपत्रातील प्रसिद्धीची बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करू असं सांगितलं होतं मात्र त्यांनी शब्द फिरवला असल्याचं शेलार म्हणाले.

दरम्यान, आशिष शेलारांनी दिलेल्या आव्हानाला नवाब मलिक काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शहा आणि पवारांच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं?, संजय राऊत म्हणाले…

प्रियांका चोप्राने मुंबईमधील दोन अलिशान बंगले विकले, ‘इतक्या’ कोटींची झाली डील

भारतासाठी आनंदाची बातमी! रवी दहियाचा धोबीपछाड देत फायनलमध्ये प्रवेश, सुवर्णपदकाची संधी

पत्नीचा वाढदिवस विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने केलं असं काही की…

“फटे लेकीन हटे नही, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना हतबलतेनं बीफचंही समर्थन करावं लागतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More