बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सामनाचा अग्रलेख म्हणजे ‘खाली डोकं वर पाय'”

मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना विरोधकांवर टीकेचे बाण सोडत असते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत नेहमीच्या आपल्या लेखणीतून भाजपला निशाण्यावर धरतात. मात्र अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या सामनावर टीका केली आहे.

आजच्या सामना अग्रलेखाला खाली डोकं वर पाय असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे सर्वात जास्त का आहे? मृत्यूची संख्या सर्वात जास्त का आहे?, मग याच पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घ्यायचं नाही का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

मुख्यंत्री उद्धव ठाकरे रोज केंद्रापुढे हात जोडत आहे. लस द्या, जीएसटीचा पैसा द्या, आम्हाला एअरफोर्सची सुविधा द्या, 18 वर्षांवरील लसीकरणाची परवानगी द्या, या सर्व गोष्टी केंद्र सरकार पुरवत आहे. तरीही केंद्राला दोष द्यायचा. त्यामुळे दुजाभावाचं राजकारण शिवसेना करत असल्याचंही शेलार म्हणाले. यावेळी त्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवरही टीका केली.

दरम्यान, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर आणि स्थायी समिती अध्यक्षांचा नालेसफाईचा दौरा म्हणजे आंधळी कोशिंबीरचा खेळ आहे. कारण ‘तेरी भी चूप मेरी भी चूप. आम्ही दावा करू शकत नाही की पाणी तुंबणार नाही असं म्हणून पळ काढता येणार नाही. जनतेला सुविधा द्यायला हव्यात आणि जर त्या दिल्या नाहीत तर किंबहुना, किंबहुना ते असे म्हणतात म्हणून जनतेच्याच रोषाला सामोरं जायला तयार राहा, असं शेलार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

 

‘आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही आता उघड झाला’; भाजपच्या ‘या’ आमदाराची जहरी टीका

“जनता हेच सर्वात मोठं न्यायालय,आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही”

धक्कादायक! शिक्षक महिलेने डाॅक्टर पतीला दिल्या झोपेच्या गोळा, नंतर दिला शाॅक अन्…

पत्नीला आपल्या छोट्या भावासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् पुढे झालं असं काही की…

…म्हणून 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण स्लो डाऊन; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More