Top News महाराष्ट्र मुंबई

“शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?”

मुंबई | दिल्लीमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीने संपुर्ण देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. राजधानीमध्ये झालेल्या तुफान राड्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी पवारांवर आणि राऊतांवर पलटवार करत निशाणा साधला आहे.

दिल्लीच्या घटनेत पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्यात आला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यांनी हे प्रकार केले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक चकार शब्द काढला नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार , संजय राऊत यांनी केलं. मग काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली?, अशा शब्दात शेलारांनी पवार आणि राऊतांवर टीका केली आहे.

दरम्यान, कधी काळी आवश्यक वाटल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार कालच्या घटनेवर तुम्ही फेसबुक पोस्ट का टाकली नाही?, असा सवालही शेलारांनी पवारांना केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीचा प्रचार, पाटील आता काँग्रेसमध्ये दाखल!

भारतातील ‘या’ शहरात पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पार

“बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम”

काँग्रेस सूडाच्या भावनेतून शेतकऱ्यांच्या आडून हिंसाचार घडवत आहे- सुधीर मुनगंटीवार

आंदोलन भडकावल्याचा आरोप असलेला दीप सिद्धू आणि भाजपचा संबंध काय?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या