Top News महाराष्ट्र मुंबई

“बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा मग गाझीपूरला जावा”

मुंबई | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे गाझिपूर सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आंदोलकांना कोणी, केव्हा, कसं भेटावं हे ज्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण सुप्रिया सुळे गाझीपूरला जात असतील तर अगोदर त्यांनी बारामतीतील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करावं, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

बारामतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मींग का करताय, याचं उत्तर अगोदर सुप्रिया सुळेंनी द्यावं, असं आशिष शेलार म्हणाले. त्यासोबतच त्यांनी बारामतीतील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करावं मग गाझीपूरला जावा, असा टोला शेलारांनी सुप्रिया सुळेंना लगावला.

दरम्यान, केंद्र सरकार ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे अशा परिस्थितीत बळीराजाला सध्या आधाराची गरज आहे. गाझीपूरला जाऊन मी शेतकऱ्यांशी आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का; कंगणाचा रोहितला रिप्लाय

“मी शेतकऱ्याची लेक म्हणून बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार”

“माझी वाट लागली तरी चालेल, पण त्याला संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही”

हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरी ही उत्तरेत- संजय राऊत

शेतकरी आंदोलन- लता मंगेशकर यांचाही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या