Top News महाराष्ट्र मुंबई

वर्षेभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालंच ना?- आशिष शेलार

मुंबई | मुंबई मेट्रो-3 प्रकल्पासाठी कांजूरमार्ग येथील 102 एकर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

जिल्हाधिकारी आपला आदेश मागे घेऊन सगळ्या पक्षकारांची नव्याने सुनावणी घेणार का, की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून नसल्याचा निष्कर्ष देऊन तो आम्ही रद्द करू?, अशी विचारणा न्यायलयाने सरकारला केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

शास्त्रीय गायनाच्या रंगलेल्या मैफलीत वर्षभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतय हे उघड झालंच ना?, असा खोचक प्रश्न त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

दरम्यान, अहंकारी राजाच्या कांजूरमार्गला मेट्रो कारशेड उभारण्याच्या “डीजे” वाजवण्याला उच्च न्यायालयाने चांगलींच तंबी दिली. कोट्यावधीचे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण? गेले वर्षभर मुंबईकरांच्या मेट्रोचा हा खेळ खंडोबा करुन डीजे डान्स करणाऱ्या ठाकरे सरकारने जनतेची आता माफी मागावी!, अशी टीकाही शेलार यांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा”

आम्ही शेतकऱ्यांच्या सल्ल्यांवर विचार करायला तयार आहोत पण…-नितीन गडकरी

“शेतकरी आंदोलन तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं, काँग्रेस शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाही”

महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल- संजय राऊत

“…तर या नटीबाईची भाजप कार्यालयात खणा-नारळाने ओटी भरावी!”

“…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या