बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेंग्विनसेनाप्रमुख म्हणत शेलारांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं

मुंबई | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून विरोधकांनी शिंदे सरकारला (Shinde Goverment) चांगलंच घेरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या मुद्द्यावरून आक्रमक झालेली असताना शिवसेनेनंही (Shivsena) त्यांचं मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे सरकारला फैलावर घेतलं.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. पेंग्विनसेना आणि पेंग्विनसेनाप्रमुख असा उल्लेख करत शेलारांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) डिवचलं.

वेदांता प्रकरणात मराठी माणसांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम पेंग्विनसेनेच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केलं जात आहे. आमचे सवाल थेट पेंग्विनसेनेला आणि पेंग्विनसेनेच्या प्रमुखांना आहेत, असं म्हणत शेलारांनी प्रश्नांची सरबत्ती लावली.

दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये खेचून नेला, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. म्हणजे हा प्रकल्प महाराष्ट्रात आणला गेला होता, असं त्यांचं म्हणणं आहे. पण हा प्रकल्प महाराष्ट्रात कधी आला होता? त्या प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण कधी केलं होतं? तुमच्या सरकारने सर्व परवानग्या दिल्या होत्या का? असा आमचा प्रश्न आहे, असं म्हणत शेलारांनी महाविकास आघाडीलाच धारेवर धरलं आहे.

थोडक्यात बातम्या-

युवासेना आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला थेट इशारा

कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More