नांदेड | केंद्राच्या कृषी विधेयकावरून सध्या देशभरातून केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला ईस्ट इंडिया म्हणत भाजवर निशाणा साधला आहे. नांदेडमध्ये ते बोलल होते.
देशावर जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने भारताची लूट केली. आता भाजप म्हणजे नवी ईस्ट इंडिया कंपनीच आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काही व्यापारी एकत्र आले आहेत आणि भाजपच्या साथीने देश लुटत आहेत अशी जोरदार टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.
ब्रिटिशांच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी होती. त्या कंपनीने देशाला लुटलं. सगळा मुद्देमाल तिकडे घेऊन गेले.
आज भाजपच्या रूपाने तशीच नवीन ईस्ट इंडिया कंपनी सुरू झाली आहे. काही व्यापारी एकत्र आले आहेत आणि भाजपच्या माध्यमातून भारताला लुटायला लागले आहेत. pic.twitter.com/E0GbINbC6B— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 2, 2020
महत्वाच्या बातम्या-
मराठा आरक्षणासाठी पार्थ पवारांनी उचलेल्या ‘त्या’ पावलावर शरद पवार म्हणाले…
“उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे”
‘त्यांना अशी शिक्षा केली जाईल की…’; हाथरसच्या घटनेवर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटमध्ये कोरानाची लस घेतली का?; शरद पवार म्हणाले…