गारपीटग्रस्त गुन्हेगार आहेत का? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का???

मुंबई | गारपीटग्रस्तांच्या हातात पाट्या देऊन त्यांचे फोटो काढले जात आहेत. ते गुन्हेगार आहेत का? असा सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विचारलाय.

गारपीटग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी जी पद्धत वापरली आहे. तिच्यावर आक्षेप घेत उमरग्याच्या अशोक पवार यांनी यासंदर्भातील फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जाऊ लागलाय. 

दरम्यान, आता काँग्रेसही याप्रकरणी आक्रमक झाली आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी विचारलाय.