मुंबई | मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारला यासाठी जबाबदार धरलं जात आहे. अशातच यावर काँग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यालायात झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने आपली बाजू योग्यरित्या मांडली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारची मागणीही मान्य केली असल्याचं अशोक चव्हणा यांनी म्हटलं आहे.
हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याची राज्य सरकारची मागणी न्यायालयाने मान्य केली. आता या घटनापीठासमोर आपल्याला बाजू मांडावी लागणार असल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजेंनी जोरदार टीका करत या लांबलेल्या सुनावणीला राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे.
दरम्यान, हे प्रकरण घटनापीठाकडेच जावं अशी सर्वांचीच मागणी आहे. पण दीड महिन्यापूर्वीच सरकारने ही मागणी का केली नाही?, असा सवाल करत समाजातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही’; शिवसेनेचं पुन्हा राणेंवर टीकास्त्
“मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली याला सरकार जबाबदार”
राष्ट्रवादी खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण
‘कोरोना गो’ म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण
मराठा आरक्षण सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली
Comments are closed.