बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत”

नवी दिल्ली | मागील 6 वर्षांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मोठ्या बेंचकडे जाण्याची गरज नाही, असं देखील सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे एकप्रकारे आता मराठा आरक्षणासाठी सर्व दरवाजे बंद होताना दिसत आहे. यातच आता मराठा आरक्षणावरून राजकारण होताना दिसत आहे.

मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस असून सरकारचा निष्काळजीपणा असल्यानं हा निकाल लागला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. कोर्टाचा आज जो निकाल आला आहे. त्याला राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे. अशोक चव्हाणांनी प्रायश्चित घ्यावं आणि ठाकरे सरकारनं याला सामोरं जावं, असं आव्हान प्रविण दरेकर यांनी दिलं आहे.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा. मराठे गप्प बसणार नाहीत. मराठे रस्त्यावर उतरतील, असा इशारा शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी दिला आहे. मराठा समाजासाठी हा दिवस दुर्दैवी दिवस आहे, असं खासदार संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या सुनावणी दरम्यान राज्यसरकारने आपली बाजू व्यवस्थित मांडली नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावरून आता पुन्हा राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

उर्वरित आयपीएल ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता; ब्रिजेश पटेल यांचं सुचक वक्तव्य

“हम लाॅकडाऊन का पालन करेंगे” सकाळी व्यायामासाठी निघालेल्या लोकांचा पोलिसांनी काढला घाम

मराठा समाजासाठी हा दुर्दैवी दिवस – संभाजीराजे भोसले

मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

‘…तर पुन्हा रॅपिड अँटीजेन आणि RTPCR चाचणी करण्याची गरज नाही’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More