Top News जालना महाराष्ट्र

“औरंगाबादचे नामांतर महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही, आमचा कायम विरोधच”

जालना | राज्यात औरंगाबादच्या नामकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलेलं दिसत आहे. नामकरणाला काँग्रेलचा विरोध असल्याने भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच काँग्रेस नेते आणि मंत्री अशोत चव्हाणा यांनी यावर आपलं मत मांडलं आहे.

औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. नामकरणाला आमचा कायम विरोधच राहणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. जालन्यात ते माध्यमांशी बोलत होते.

आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार असल्याचं म्हणत चव्हाणांनी फडणवीसांच्या टोल्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नुरा कुस्ती सुरु आहे, अशी उपमा विरोधी नेते देवेंद्र फडणवीसांनी दिली होती.

थोडक्यात बातम्या-

लेडी PSI ची आत्महत्या; पत्रात लिहिलं ‘हे’ कारण!

“भाजपची लस घेऊ शकत नाही, त्यांच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू”

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी

“तेव्हा शिवसेना गोट्या खेळत होती का?”

“राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या