Top News औरंगाबाद महाराष्ट्र

“अशोक चव्हाण यांचा प्रामाणिकपणा भावला अन् लग्नाचा निर्णय घेतला”

नांदेड |  व्हॅलेंटाईन दिनाचं औचित्य साधत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची अभिनेता रितेश देशमुख याने मुलाखत घेतली.  यावेळी अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांनी अनेक विषयांवर दिलखुलासपणे बातचीत केली. तसेच त्यांनी आपल्या प्रेमाचाही उलगडा केला.

तुम्ही अशोक चव्हाण यांच्यात कोणता गुण पाहिलात ज्यामुळे तुम्ही संसार थाटण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्व रितेशने अमिता यांना विचारला होता. त्यावर अशोक चव्हाण यांच्यामधला प्रामाणिकपणा (honesty) मला सर्वाधिक भावला अन् मी लग्नाचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं.

अशोक चव्हाण यांचे वडिल शंकरराव चव्हाण हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला डील करण्यात काही अडचण आली का? किंवा काही दडपण होतं का? या प्रश्नावर निश्चित दपडण होतं. पण प्रेमापुढे काय??? आम्ही दोघांनीही घरच्यांना समजावलं आणि लग्नाचा निर्णय घेतला, असं अमिता यांनी सांगितलं.

अशोकच्या घरात पहिल्यापासूनच प्रेमाचं आणि खेळीमेळीचं वातावरण होतं. मी माझ्या सासुबाईंना कधीच सासुबाई म्हटलं नाही. मी नेहमी आईच म्हणते. त्यांनीही मला खूप सांभाळून घेतलं, असंही त्यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

‘सविता भाभी…तू इथंच थांब’ होर्डींग्सचं कोडं उलगडलं

मी पक्षाचा झेंडा बदललाय, भूमिका नाही; राज ठाकरेंनी केलं स्पष्ट

महत्वाच्या बातम्या-

पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीची आरएसएस संदर्भातील कार्यशाळा अखेर रद्द

…तर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आम्ही साथ देऊ- इम्तियाज जलील

छत्रपतींच्या जीवन प्रवासावर आधारित ‘शिवसृष्टी’ उभारण्यात येईल; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या