बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?”

परभणी | देशात कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही?, असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय.

मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. मुळात हा आरोप राजकीय आहे. भाजपवाले यात विषयात घुसले असून त्यांनीच मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नसल्याची बोंब उठवली आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी भाजपवर निशाणा साधलाय.

परभणी येथे एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी अशोक चव्हाणांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय.

विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

Shree

‘तुम्ही कठीण काळातही भन्नाट काम केलं’; मुंबई पोलिसांचं हायकोर्टाकडून कौतुक

दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते, पण…- अशोक चव्हाण

विजय वडेट्टीवारांच्या त्या भूमिकेला भाजपचं समर्थन!

महिलेने मारहाण केल्यानंतरही संयमाने परिस्थिती हाताळणाऱ्या एकनाथ पार्टेंचा गृहमंत्र्यांकडून सत्कार!

“भाजपचे नेते पाठीमागून उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More