अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात एकनाथ खडसेंचा भाचा अटकेत

मुंबई | पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केलीय. राजेश पाटील असं या आरोपीचं नाव असून तो भाजप नेते एकनाथ खडसे यांचा भाचा असल्याची माहिती आहे. 

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात यापूर्वीच प्रमुख आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांना अटक केलीय. त्यांच्या चौकशीत राजेश पाटील यांचं नाव समोर आलं. 

राजेश पाटील वीज विभागाकडून कंत्राटं घेण्याचं काम करतो. मात्र अश्विनी बद्रे प्रकरणात त्याचा काय संबंध आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.