बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! ‘या’ शुल्लक कारणामुळे महिलेने हाॅटेल कर्मचाऱ्यांना धो-धो धुतलं; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोनानं सगळीकडे थैमान घातलं असताना सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे गरजेचं असल्यामुळे लसीकरण मोहिम राबवली जातेय. कोरोना महामारीत कुठेही गेला तरी लसीकरण झालंय आहे का? हे हमखास विचारलं जातं. मात्र काहींना या गोष्टीचाही राग येतो. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका रेस्ट्राॅरंटमधील हा व्हिडीओ असून हाॅटेलमध्ये प्रवेश करताना लसीकरण केलं आहे का, हे तपासलं जात होतं. मात्र काही महिलांना लसीकरण केल्याचा पुरावा मागितल्यानं राग आला आणि त्यांनी तेथील काम करणाऱ्या तरुणीला मारहाण करायला सुरुवात केली. ही घटना अमेरिकेतील मॅनहटन येथील असून या घटनेचा व्हिडीओ काही क्षणातच व्हायरल झाला आहे.

लसीकरणाचा पुरावा मागितल्यामुळे त्या महिलांनी रेस्ट्राॅरंटमधील काम करणाऱ्या दोन जणांना बेदम मारहाण केली. आसपासच्या लोकांनी त्यांना अडवत सगळा प्रकार पोलिसांना कळवला. त्यांनंतर पोलिसांनी यावर कारवाई करत त्या महिलांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, कोरोना काळात असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळाले. अशा अनेक मारहाण केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोना आणि लसीकरणाला गंभीरतेनं घेणं गरजेचं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

…अन् रिमझिम पावसामुळे इमारत पत्त्यासारखी कोसळली; पाहा व्हिडीओ

“शरद पवार आमचे नेते नाहीत, आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठीची तडजोड”

‘भविष्यातही कोरोना महामारीपासून सुटका नाहीच’; गगनदीप कांग यांचं मोठं वक्तव्य

मराठवाड्यातील नद्यांना महापुराचा धोका; मुसळधार पावसामुळे काढणीला आलेली पिकं संकटात

किचनमध्ये काम करताना अचानक महिलेच्या केसांनी घेतला पेट अन्…; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More