बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

पुणे | आंबेगाव तालुक्यातील धामणी गावामधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे जवळचे मानले जाणारे सचिन जाधव यांची निर्घुन हत्या करण्यात आली आहे. पैशाच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याची माहिती समजत आहे.

सचिन जाधव यांनी बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांना पैसै दिले होते. जाधव यांनी हे पैसे परत मागितले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून यांच्यातील वाद टोकाला पोहोचला होता. याच वादातून मंगळवारी रात्री आठच्या सुमारास भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळच असलेल्या कोंदेवाडी फाट्याजवळ घटनेला सुरूवात झाली. यातूनच त्यांची थिटे आणि सूर्यवंशी यांनी मिळून जाधव यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.

सचिन जाधव यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीत ठेवण्यात आला आणि ती गाडी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने गेली. पुणे जिल्हा संपताच नगर जिल्ह्यातील कोरथन घाट लागला. याच घाटातील दरीत जाधव यांचा मृतदेह पेटवून देण्यात आला. आरोपींचा पुरावे मिटवून टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र दुसरीकडे सचिन जाधव यांच्या कुटुंबियांनी जाधव यांची मिसिंग झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास सुरू झाला आणि आज त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला.

दरम्यान, पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवली आणि तपासात बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात नाहीत, राज्यसरकारची घोषणा फसवी”

“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो”

डाॅक्टर होऊ घातलेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाची कोरोनाशी झुंज अपयशी; मित्रांनी उपचारासाठी जमवले होते पैसे

लोकांना लसी मिळत नाहीत आणि ‘या’ तीन राज्यात वाया जातात सर्वाधिक लसी!

शाब्बास पुणेकर! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More