Loading...

किती खावं याची काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनो जरा लाज धरा- उद्धव ठाकरे

परभणी | काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी किती खायचं यावर थोडा विचार करायला हवा. थोडी लाज बाळगायला हवी, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेचे गंगखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ प्रचारसभेत ते बोलत होते.

आमच्यासमोर लढण्यासाठी राष्ट्रवादी आता शिल्लक राहिली नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पालम येथे जाहीर सभा पार पडली त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे.

Loading...

पीक विमा योजन्याचा प्रश्न गंभीर झाला होता. विमा कंपनीचे दलाल पैसे द्यायला येतात मात्र पैसे देत नाहीत. पण शिवसेनेने त्यांना जागेवर आणलं आहे. शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 1100 कोटी रुपये द्यायला त्यांना शिवसेनेने भाग पाडलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, मला सरकारची कर्जमाफी पटलेली नाही. आता सरकार येेऊ द्या मला शेतकरी कर्जमुक्त करायचा आहे, असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

Loading...