बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

येत्या तीन महिन्यात मध्यावधी निवडणुका लागणार?, रोहित पवारांच्या वक्तव्याने खळबळ

पुणे | देशात झाली नसतील एवढ्या राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात घडल्या. देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या राज्यातील राजकीय वाद आणि डावपेच देखील तितकेच मोठे असतात. गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात मोठे राजकीय वादळ सुरु झाले. ते अद्याप थांबायला तयार नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत सत्ता उलथवून लावली असली तरी अद्याप हे सत्ताकराण संपलेले नाही.

आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सध्याची परिस्थिती पाहाता, पंचायत समितीच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. पुढील तीन महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) निवडणूका आहेत. त्यानंतर लगेचच आमदारकीच्या म्हणजे विधानसभेच्या (Assembly Election) निवडणूका होण्याची शक्यता आहे, असं मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलं.

2024 नंतरचा काळ हा युवकांचा काळ आहे. युवकांच्या काळात निर्णय सुद्धा आपण घेणार आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे मार्गदर्शन आमच्या पाठिशी आहेच, पण निर्णय मात्र नवीन पिढिचे रहाणार, असे रोहित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गणिते जुन्या नाहीतर तरुणांच्या हातात आहेत, असेही रोहीत पवार म्हणाले.

दरम्यान, त्यांनी असे वक्तव्य का केले? यावरुन आता राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. त्यांनी मध्यावधी निवडणूका होतील, असे ठामपणे कसे काय म्हटले? याचा सगळे विचार करत आहेत. काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही हे सरकार कोसळून राज्यात मध्यावधी निवडणूका अटळ आहेत, असे भाकित केले होते.

थोडक्यात बातम्या – 

शिवसेना फोडल्याचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंनाच – राज ठाकरे

“दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार”

“संजय राऊत बेरोजगार आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात”

शिंदे गट मनसेत विलीन होणार?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

पाचव्या मजल्यावरून चिमुकली थेट खाली, देवासारखा आला तरूण; चित्तथरारक घटना कॅमेऱ्यात कैद

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More