Top News राजकारण

रवी राणांच्या पोषाखावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संतापले

मुंबई | आजपासून राज्यातील विधानसभेच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीये. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आमदार रवी राणा यांनी वेगळा पोषाख परिधान केला होता. मात्र या पोशाखावरून वादाची ठिणगी पडली.

‘उद्धवा अजब तुझे सरकार, शेतकऱ्यांचं मरण, हेच राज्य सरकारचं धोरण’, अशा आशयाचं पोस्टर असलेला पोशाख रवी राणा यांनी परिधान केला होता. दरम्यान या पोषाखावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेप घेतला.

नाना पटोले यांनी राणा यांच्या पोषाखावर आक्षेप घेत त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. मात्र तरीही रवी यांची सरकारविरोधात घोषणाबाजी सुरुच होती.

“रवी राणा यांची कृती योग्य नाही. जर अशा पद्धतीचा पोषाख परिधान करुन कोणी सभागृहात येण्याचा प्रयत्न केला तर यापुढे त्यांना गेटवर थांबवण्यात यावं,” असे आदेश नाना पटोले यांनी दिलेत.

थोडक्यात बातम्या-

2020 मधील शेवटचं सूर्यग्रहण आज; ‘या’ ठिकाणी पाहता येणार सूर्यग्रहण

“पर्यटन मंत्र्यांनी खाजगी पर्यटनाच्या “दिशेला” जाताना जीन्स घालावी सरकारी कामकाजात नव्हे”

मला आता आरामाची गरज आहे; कमलनाथ यांचं मोठं विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित!

“कुणाला माहिती आहे, नव्या संसद भवनाच्या निर्मितीसाठी ‘टाटा’ची कशी निवड झाली?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या