मुंबई | शिवसेना सोडून जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांना देऊनही बरेच आमदार आसाम जवळ करू लागले आहेत. शिंदे गटाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शिंदे गटाची मनधरनी करण्याचे अनेक प्रयत्न अनेकांनी करुन पाहीले तरीही गट ऐकायला तयार नाही. शेवटी महाविकास आघाडी सरकारने कारवाईचे शस्त्र देखील वापरले. तरीही कोणी दाद देईना.
अपात्रतेची कारवाई करण्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची महत्वाची भूमिका आहे. परंतु मागील काही काळापासून झिरवळ यांचा काही पत्ता नाही. ते कुठे आहेत याची कोणालाच काही माहिती नाही. याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
आघाडी सरकार टिकवण्यासाठी आघाडीचे प्रणेते शरद पवार यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत त्यांनी नरहरी झिरवळ यांना काही सूचना केल्या आहेत. बंडखोर आमदारांचे सभासदत्व रद्द करण्यासंदर्भात ह्या सुचना आहेत. त्यांनी झिरवळ यांना काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत, काही गणिते दिली आहेत. ती सतत बदलत रहाणार आहेत. एकदा काय एकनाथ शिंदे यांचे सदस्यत्व रद्द झालं की सर्वच राजकीय चित्र पालटणार आहे.
एकनाथ शिंदे गटातील 17 आमदारांना अपात्र ठरविण्यात येणार आहे अशी माहीती मिळते आहे. एकूण 34 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र सुनिल प्रभू यांनी केली. परंतु कारवाई करणारे गृहस्थच सध्या नॉट रिचेबल आहेत म्हणून मोठा राजकीय गोंधळ उडाला आहे.
थोडक्यात बातम्या –
“बेताल वक्तव्य करणारे कोण हे सर्वांनाच माहिती, इथे धमकीला कोणी घाबरत नाही”
उद्धव ठाकरेंना काळजी नाही कारण त्यांना माहितीये ‘त्यावेळी’ इंदिरा गांधी अजिंक्य राहिल्या!
‘तुम्ही फक्त सतरंज्या झटका’, महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर इंदुरीकर महाराज स्पष्टच बोलले
शिवसेनेला आणखी एक झटका, ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई
‘हा भाजपचा डाव’, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया
Comments are closed.