बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदींनी मला चर्चेला न बोलवणं म्हणजे हा औरंगाबादच्या आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान”

हैदराबाद | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशावर मोठ संकट येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महत्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावरून मोदींनी या चर्चेला मला निमंत्रण दिलं नाही हा तर औरंगाबादच्या आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान असल्याचं एमआयएमचे प्रमुख खासदार असुद्दीन औवेसी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनला (एआयएमआयएम) आमंत्रित करण्यात आलेलं नाही. हा औरंगाबाद आणि हैदराबादकरांचा अपमान असल्याची टीका ओवेसींनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

औरंगाबाद आणि हैदराबादकरांनी एमआयएमला पसंती दिली म्हणजे ते माणूस म्हणून कमी महत्त्वाचे आहेत का? तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय, यामागचं नेमकं कारण काय? आमच्या लोकांच्या व्यथा, मग त्या आर्थिक दृष्टीकोनातून असोत वा मानवतावादी दृष्टीकोनातून, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे, असं औवेसींनी ट्विटमध्ये म्हटलं म्हटलं आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅगदेखील केलं आहे.

दरम्यान, हैदराबाद आणि औरंगाबादच्या जनतेनं अनुक्रमे माझी आणि इम्तियाज जलील यांची निवड केली. आम्ही त्यांचे प्रश्न, समस्या मांडू यासाठी त्यांनी आम्हाला निवडून दिलं. मात्र आता आम्हाला त्यांच्या समस्याच मांडता येत नाहीत. हैदराबादमध्ये कोरोनाचे 93 रुग्ण आढळून आले आहेत. याबद्दलच्या काही संकल्पना मला मांडायच्या असल्याचं औवेसींनी म्हटलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

अब_आगे_क्या; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा मोदींवर निशाणा

कोरोनाला पळविण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार, पाहा व्हिडीओ

महत्वाच्या बातम्या-

अकलेचे दिवे लावणे यालाच म्हणतात, सचिन सावंतांचा भातखळकरांवर निशाणा

मुस्लिम समाजानेही फ्लॅशलाइट लावून दिला एकजुटीचा संदेश

भाजपचा स्थापना दिवस; प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरात नवीन झेंडा फडकवण्याच्या सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More