अहमदनगर महाराष्ट्र

“प्रकाश आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही”

अहमदनगर | मी म्हणालो होतो की रिपब्लिकन पक्षांमध्ये ऐक्य होणार असेल तर मी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. मात्र आता आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही, असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलंय.

प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. आता ऐक्य शक्य नाही, असं आठवले म्हणालेत. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

मतं खाण्याच्या राजकारणामुळे समाजाला फायदा होणार नसल्याचं म्हणत रामदास आठवले यांनी आंबेडकरांवर टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतःच्या बळावर चांगली मतं घेतली. मात्र त्यांचा एकही खासदार किंवा आमदार निवडून आला नाही. त्यांच्या मतं खाण्याच्या राजकारणामुळे समाजला फायदा होणार नाही, अशी टीका आठवलेंनी केली.

थोडक्यात बातम्या-

वर्षा संजय राऊत यांचं ईडीला पत्र; केली ‘ही’ मागणी

“अरुण जेटली असते तर शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाला असता”

खळबळजनक! विधान परिषद उपसभापतींची आत्महत्या, रेल्वे रुळावर सापडला मृतदेह

“स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्यानंतर देश घडवण्यात काँग्रेसचं योगदान मोठं आहे”

“पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या