मनोरंजन

अथिया शेट्टी, के एल राहुलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Loading...

मुंबई | अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अथिया शेट्टी क्रिकेटर के. एल. राहुलला डेट करतेय, अशा चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहेत. अथिया आणि राहुलचे फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यामुळे या चर्चेला परत उधाण आलयं.

काही दिवसांपूर्वी अथियाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टवर फॅशन डिझायनर विक्रम फडणवीसने केलेल्या कमेंटमुळे अथियाचं नाव के. एल. राहुलशी जोडलं जातंय. हल्ली तू खूपचं उत्साही दिसतेस चल ‘केएल’ला जावूया  म्हणजेच ‘कुआलांपुर’ला जावूया, अशी विक्रमनं कमेंट केली होती.

Loading...

विक्रमने केलेल्या कमेंटमुळे परत एकदा अथिया आणि राहुल यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. सिनेसृष्टी आणि क्रिकेटविश्व यांचं नातं आता कुणासाठीही नवीन नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विराट आणि अनुष्का.

अथिया लवकरच अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत ‘मोतीचूर चकनाचूर’या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन देबा मित्रा हसन करत आहेत.

Loading...
View this post on Instagram

 

About last night in Mumbai !😍💗 @rahulkl @athiyashetty

A post shared by Die Heart Of KL RAHUL👑 (@klrahul_lifeline) on

महत्त्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या