बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद | नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधवांवर आहे. या प्रकरणाची औरंगाबादमधील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने जाधवांविरोधात लेखी तक्रार दाखल केली.

पीडित व्यक्तीने पोलिसांकडे हर्षवर्धन जाधवांवर अ‌ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल केला.

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्यांना हर्षवर्धन जाधव यांनी सडकून टीका केलेली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“पंतप्रधान कार्यालयातील हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवारांच्या संपर्कात”

“पोंक्षे, औषध वेळेवर घेत चला, डोक्यावर परिणाम होतोय”

महत्वाच्या बातम्या-

आदित्य ठाकरेंची पाठराखण करत रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

“भाजप सरकार घालवण्याची जबाबदारी काँग्रेसलाच पार पाडावी लागेल”

…तोपर्यंत आम्ही जनतेचे वकील म्हणून काम करू- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More