दलित नेता जिग्नेश मेवानीवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

अहमदाबाद | गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवानी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलाय. बनासकाठाच्या वडगाव विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला.

हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोरसोबत जिग्नेश मेवानी हे भाजपला विरोध करणारं मोठं नाव आहे. हार्दिकनं थेट काँग्रेसशी हातमिळवणी केली नसली तरी जिग्नेश आणि अल्पेश मात्र काँग्रेससोबत गेले आहेत.

दरम्यान, आपल्यावर ज्यांनी हल्ला केला ते भाजपचे कार्यकर्ते होते, असा आरोप जिग्नेश मेवानी यांनी केलाय. तसेच मी अशा हल्ल्यांना घाबरणार नाही, असंही जिग्नेश मेवानी यांनी म्हटलंय.