बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओवैसींच्या दिल्लीतील निवासस्थानाची जमावाकडून तोडफोड, 5 जण पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली | सध्या राजकीय वर्तुळात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोप चालू आहेत. राजकीय वातावरण ढवळलेलं असतानाच आता एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानावर काही लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास ओवैसींच्या निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना गजाआड टाकलं आहे. सध्या पोलीस आणखी तपास करत आहेत. या घटनेनंतर हिंदू संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतली असून एक निवेदन जारी केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार ओवैसींनी हिंदू विरोधी वक्तव्य केलं होतं. यामुळे संतापलेल्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या ताब्यात असणारे सर्वजण मंडोली भागातील रहिवासी आहेत.

या घटनेनंतर ओवैसींनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या घरावर हल्ला होण्याची ही तिसरी वेळ आहे. माझ्या निवासस्थानाच्या बाजूला निवडणूक आयोग आहे. पंतप्रधानांचं घर फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर आहे. तरिही माझ्या निवासस्थानाला सातत्याने लक्ष केलं जात आहे. एका खासदाराचंच घर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचं काय?, असा सवाल ओवैसींनी केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

…मग राज्यपालांना एवढा अधिकार नाही का?- चंद्रकांत पाटील

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहांची घेणार भेेट!

भाजपच्या ‘त्या’ 12 निलंबित आमदारांना निवडणुक आयोगाचा मोठा दिलासा

“राज्यपालांच्या डोक्यावरील टोपी ही विद्वत्तेची, त्यांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे

महात्मा गांधी जयंतीला कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी करणार काॅंग्रेसमध्ये प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More