Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

“अहो, आधी तुमची मानसिकता बदलायला हवी, मग दुसऱ्यांना सल्ला द्या”

Photo Credit- facebook/ Atul Bhatkalkar, Uddhav Thackarey

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या नागरिक निष्काळजीपणे वागत असून, कोरोनासंदर्भात ठरवण्यात आलेेेल्या नियमांचं उल्लंघन होत आहे त्यामूळे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईमध्येही कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लोकांची होणारी गर्दी पाहता कार्यालयीन वेळा बदलण्याची भूमिका मांडली आहे. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय? मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री.. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी…मग दुसऱ्यांना सल्ला द्या, अशा शब्दात भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

कार्यालयीन वेळेच्या बाबती पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावं, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत केली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री फिल्डवर न फिरता फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत होते, सर्वसामान्यांना होणारा त्रास पाहण्यासाठी मुख्यमंत्री कधीही फिरकले नाही, केवळ मातोश्रीत बसून मुख्यमंत्री सरकार चालवतायेत असा आरोप विरोधकांकडून केला जात होता, त्यातच आता कार्यालयीन वेळा बदलण्याच्या मागणीवरूनही भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘या’ तारखेपर्यंत पुण्यातील शाळा, महाविद्यालये बंद; वाचा काय काय असतील निर्बंध

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा मोठा निर्णय!

अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना- जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद शहरात विना-मास्क ऑटो चालकांवर होणार ‘ही’ कारवाई

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या