बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बनावट रेमडेसिवीर प्रकरणात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता”; भाजप आमदाराच्या ट्विटनं खळबळ

मुंबई | कोरोनाने देशभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा देखील अपुऱ्या पडू लागल्या आहेत. तर दुसरीकडे बाजारात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवू लागताच सर्वत्र काळाबाजार चालू झाला आहे. रेमडेसिवीरची इंजेक्शन 40 ते 50 हजारांना विकली जात आहेत. पोलिसांनी आता या प्रकरणात धडक कारवाई सुरू केली आहे. बारामतीत बोगस रेमडेसिवीरचा साठा जप्त करण्यात आला होता. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये रेडमेसिवीरच्या मोकळ्या बाटल्यांमध्ये लिक्विड पॅरासिटामॉल भरून विक्री केली जात होती. हे नकली औषध 35 हजारांना एक, या दरात विकलं जात होतं. पोलिसांनी नकली औषध विकणाऱ्यांना टोळीला अटक केली होती. यावरून भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी एक ट्विट केलं आहे. “साहेब आणि कार्यकर्ते अगदी शेम टू शेम. राष्ट्रवादी पुन्हा, लावतात लोकांना चुना… हे शक्य झालंय साहेबांच्या धोरणामुळे!”, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर यांनी एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा देणाऱ्या दिलीप गायकवाड नावाच्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोस्ट टाकली आहे. त्याचबरोबर नकली औषध विकणाऱ्यांना टोळीची बातमी टाकली आहे. त्यात दोन्ही ठिकाणी नाव सेम असल्याचं अतुल भातकळकर यांनी दाखवलं आहे. त्यानंतर त्यांनी “राष्ट्रवादी पुन्हा, लावतात लोकांना चुना…”  असं ट्विट केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणात कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याचा देखील समावेश असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. बारामती पोलिसांनी या प्रकरणी 4  जणांना अटक केली आहे. या 4 जणांमध्ये असलेला दिलीप गायकवाड हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजप नेत्यानं केल्यानं खळबळ उडाली आहे.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनाची लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी खाल्ल्याने होणार नाही साईड इफेक्ट

‘देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती’; संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी

येत्या दोन दिवसात बीडमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध होईल- धनंजय मुंडे

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन

होम क्वॉरंटाईन होऊन घरून उपचार घेत असाल तर सावधान;’या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं ठरू शकतं धोकादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More