मुंबई | मेट्रो कारशेडवरून भाजप आणि ठाकरे सरकारमध्ये वादंग चालू आहे. सौनिक समितीतील सदस्यांनी मुंबई आणि उपनगरांत सर्व ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यानंतर एक अहवाल सादर केला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
काही ठिकाणे पर्यावरणाच्या दृष्टीने न चालणारी तर काही ठिकाणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारी असल्यामुळे आरेइतकी उत्तम जागा मुंबईत नसल्याचं सौनिक समितीने अहवालात नमूद केलं आहे. याच मुद्याचा धागा पकडत भातखळकरांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य… समितीचा अहवाल… तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार, असं अतुल भातखळकरांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नवीन ठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्याच्या नियोजनाचं आणि ब्लु प्रिंटचे मुंबईतील लोकप्रतिनिधींना सादरीकरण करावं, अशी मागणीही भातखळकरांनी याआधी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली होती.
आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य… समितीचा अहवाल…
तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार… @OfficeofUT pic.twitter.com/5kl3Lc8HOA— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 25, 2020
थोडक्यात बातम्या-
मनसेचं खळखट्याक! पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं फोडली
ग्रामपंचायत सदस्यासाठी आता शिक्षणाची अट; नव्या जीआरनं अनेकांना मोठा झटका!
अंकिता लोखंडेनं बाॅयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केला; खाली कमेंटचा पाऊस पडला!
‘सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही’; सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रीतम मुंडेंचं प्रत्युत्तर
“सत्तारांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी आम्ही त्यांना…”