बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं, राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो”

मुंबई | विरारमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यावर माध्यमांशी बोलताना विरारमधील घटना ही काही नॅशनल न्यूज नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राजेश टोपेंवर सडकून टीका केली आहे. किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे! अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा. त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी दुःख तरी व्यक्त करा. राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो, अशा शब्दांत भातळकर यांनी टोपेंच्या वक्तव्याचा निषेध केला.

या दुर्घटनेप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, रुग्णांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. रुग्णलयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची तर जखमींच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

या दुर्घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीव्र दुःख व्यक्त केलं असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

देशात कोरोनाचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

‘IFFLA’मध्ये मराठमोळ्या अक्षय इंडीकरची मुलाखत घेणार अनुराग कश्यप!

आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल- प्रविण दरेकर

मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना अटक

यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही- राज ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More